ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूज़

उल्हासनगर येथील इमारतीचा स्लॅब कोसळुन तिघांचा मृत्यु तर 2 जखमी

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून तिघांचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तर स्लॅब कोसळुन 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. उल्हासनगरमधील कॅम्प 3 भागातील मेमसाब नावाच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

अग्‍नीशमन दलाचे जवान आणि पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहेत. मदतकार्य युध्दपातळीवर चालु असल्याची माहिती देण्यात आली आहे.झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

ज्या इमारतीमध्ये ही घटना घडली ती इमारत जुनी होती. महापालिकेकडुन त्या इमारतीला धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आले होते की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इमारतीची डागडुजी वेळेवर न करण्यात आल्याने ही घटना घडल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावरील स्लॅब कोसळून तो तळमजल्यावर आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दुपारच्या वेळी अशाप्रकारची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांनी इमारतीजवळ गर्दी केली होती.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button