थर्ड आय

‘बुर्ज खलिफा’ ‘जगातील सर्वात उंच इमारत’ हा किताब गमावणार ?

दुबई : वृत्तसंस्था – आता लवकरच ‘जगातील सर्वात उंच इमारत’ मानली जाणारी  ‘बुर्ज खलिफा’ ही ‘जगातील सर्वात उंच इमारत’ हा किताब गमावण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. कारण आता पश्‍चिम आशियात दोन टॉवर्स यापेक्षाही अधिक उंचीचे बनण्यासाठी स्पर्धा करीत आहेत. मुख्य म्हणजे हे दाेन्ही टॉवर्स 2020 च्या पूर्वीच पूर्ण होऊ शकतात. ‘बुर्ज खलिफा’ या इमारतीची उंची  828 मीटर आहे. आता तयार होणारे नवीन दोन्हीही टाॅवर्स याहून उंच होण्यासाठी स्पर्धा करत आहेत.
दुबईच्या बड्या डेव्हलपर ‘एम्मार प्रॉपर्टीज’ने ही नवी इमारत बांधण्यासाठी काम सुरू केले आहे. यातील पहिला टाॅवर जो आहे तो  दुबईच्याच क्रीक हार्बरमध्ये बनवला जात आहे. त्याची उंची 938 मीटर असणार आहे. या इमारतीमध्ये उंचीशिवाय अन्यही अनेक वैशिष्ट्ये असणार आहेत. त्यामध्ये फिरती बाग, फिरत्या बाल्कनी आदींचा समावेश आहे. ही इमारत दुबई क्रीकच्या मध्यभागी बनवली जाईल. ही इमारत बनवण्यासाठी सुमारे 65 अब्ज रुपये खर्च येणार आहे.
यापैकी दुसरा टाॅवर जो आहे त्याचे नाव  ‘जेद्दाह टॉवर’ आहे.  2020 मध्ये सौदी अरेबियातील हा टाॅवर दुबईत बनत असलेल्या क्रीक हार्बर टॉवरपेक्षा 72 मीटर अधिक उंच असणार असल्याचे समजत आहे. या इमारतीचे काम 2013 मध्ये सुरू झाले होते. त्यावेळी त्याला ‘किंगडम टॉवर’ असे नाव देण्यात आले होते. गतवर्षीच ही इमारत बांधून पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, आता ती दोन वर्षे उशिरा तयार होत आहे. या इमारतीची उंची 3281 फूट असणार आहे.
सध्या मात्र बुर्ज खलिफा’ ही सर्वात उंट इमारत आहे. ‘बुर्ज खलिफा’ बांधण्यासाठी 5 वर्षे लागली होती. ही इमारत बांधण्यासाठी दीड अब्ज डॉलर्सचा खर्च आला होता. 2004 मध्ये तिचे काम सुरू झाले होते आणि ऑक्टोबर 2009 मध्ये ते पूर्ण झाले. 4 जानेवारी 2010 मध्ये तिचे उद्घाटन झाले होते. आता लवकरच बुर्ज खलिफाची जागा नवे टाॅवर घेण्यार असल्याचे दिसत आहे.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या