क्राईम स्टोरी

चालत्या कारने घेतला पेट

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपळे गुरव येथे रविवारी सायंकाळी चालत्या कारने पेट घेतल्याने लागलेल्या आगीत कार जळून खाक झाली.

अग्निशामक विभागाने माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील जगताप पेट्रोल पंपाजवळ मोटारीतून धूर येत असल्याची माहिती नागरिकांनी चालकास दिली. मोटारीतील व्यक्‍ती खाली उतरली असता मोटारीने पेट घेतला. एका नागरिकाने मोटारीला आग लागल्याची माहिती ४ वाजून ५० मिनिटांनी अग्निशामक दलास दिली. त्यानुसार रहाटणी अग्निशामक उपकेंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला. १० मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत कार जळून खाक झाली. इंडिका मोटार (एमएच १४/ सीके ६६७७) ही सतीश कांबळे यांच्या मालकीची आहे. शनिवारी, (दि ९) संभाजीनगर चिंचवड येथे अशीच एक घटना घडली होती.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button