ती लक्झरी बसच उदयनराजेंच्या छबीने सजली

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावरील प्रेमापोटी एका समर्थकाने चक्क लक्झरी बस उदयनराजे यांच्या स्टाईलच्या फोटोंनी सजवली आहे. निष्ठावंत कार्यकर्ता आपल्या राजेंसाठी काही करू शकतो. साताऱ्यात प्रत्याक्षात पाहण्यास मिळत आहे. हे जर राजेच्या कार्यकर्त्याने केले असेल तर त्याला तोड नाही.

खासदार उदयनराजे भोसले यांच्यावरील प्रेमापोटी एका समर्थकाने चक्क लक्झरी बस उदयनराजे यांच्या स्टाईल इज स्टाईलच्या प्रतिमेत सजवली आहे.

नुकतीच खासदार यांच्या जलमंदिर या निवासस्थानी या समर्थकाने ही लक्झरी दाखविण्यासाठी आणली होती. आपल्या हटेक स्टाईलच्या चित्रांना रंगविलेली ही बस पाहून उदयनराजे खूष झाले . यावेळी त्यांनी या बस सोबत फोटो काढून समर्थकाला प्रेमाला दाद दिली. पुसेगाव येथील अक्षय जाधव यांचीच ही शिवराज ट्रॅव्हलच्या ताफ्यातील ही बस आहे.