पॉपकॉर्न असणाऱ्या ‘या’ रहस्यमयी बीचची सोशल मीडियात चर्चा

वृत्तसंस्था : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात अनेक प्रकारचे समुद्र आणि बीचेस तुम्ही पाहिले असतील.असेही समुद्र पाहिले असतील जे गुलाबी पाणी असणारे आहेत, तर एक असा समुद्र आहे जिथे माणूस बुडत नाही. परंतु काही अनोख्या बीचबद्दल तुम्ही ऐकले आहे का ? आता एक अनोखे बीच समोर आले आहे जिथे वाळू ऐवजी चक्क पाॅपकाॅर्न असतात. वाचून आश्चर्य वाटले ना ? बीचवर पाॅपकाॅर्न कसे असू शकतात असा प्रश्नही तुम्हाला नक्कीच पडला असेल. आपणही याचीच माहिती घेणार आहोत की या बीचवर पाॅपकाॅर्न कसे कय आहेत?
जिकडे तिकडे पांढऱ्या रंगाचे पाॅपकाॅर्न दिसणारे हे बीच स्पेनमधील आहे. छायाचित्रात तुम्ही पाहत असलेला नजारा हा स्पेनमध्ये असणाऱ्या कॅनरी आयलॅंडच्या बीचचा नजारा आहे. हेच ते बीच जिकडे तिकडे केवळ पाॅपकाॅर्न दिसत आहेत.
तुम्हाला आणखी एक सत्य पण मजेशीर बाब माहीत नसेल. अनेकांना पाॅपकाॅर्न म्हटलं तर तोंडाला पाणी सुटत असेल आणि ते खायची इच्छा होत असेल. परंतु या बीचवरील पाॅपकाॅर्न मात्र तुम्ही खाऊ शकत नाहीत हे तुम्हाला विसरून चालणार नाही. कारण हे पाॅपकाॅर्न तर आहेत परंतु दगडाेच पाॅपकाॅर्न आहेत. त्यामुळे तुम्ही हे पाॅपकाॅर्न खाऊ शकत नाही. हे पाॅपकाॅर्नसारखे दिसणारे दगड फक्त पांढरे शुभ्रच नाहीत तर ते चमकतातसुद्धा. पॉपकॉर्नसारख्या दिसणाऱ्या दगडांमुळे हा बीच दिवस-रात्र चमकत असतो हीच या बीचची खासियत आहे.
पाॅपकाॅर्न असणाऱ्या या बीचचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे नेटकऱ्यांकडून या फोटोंना पसंती मिळत असून अनेक नेटकऱ्यांमध्ये याची चर्चा होताना दिसत आहे. नेटकऱ्यांकडून हे फोटो शेअर होतानाही दिसत आहेत.