ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूज़

कार अपघातात दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव वेगात जाणाऱ्या कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (गुरुवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास धुळे-जळगाव मार्गावरील नंदाळे गावाजवळ झाला. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आकाश रूपा विरपन (वय-३२), रितेश संजय विरपन (वय- २८ रा. संभाजी नगर, ता.रावेर) असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे दोघे मुंबई पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश आणि रितेश हे होंडा सिटी (एमएच ०६ डब्ल्यू ६०४६) कारमधून धुळेहून जळगावच्या दिशेने भरधाव वेगात जात होते. नंदाळे फाट्याजवळ कार आली असता कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. कार भरधाव वेगात असल्याने कार रस्त्याच्याकडेला असलेल्या कवठ आणि लिंबाच्या झाडावर तीन फूट जाऊन लटकली. या मार्गावरुन जाणाऱ्या विजय डोंगरे यांनी तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची माहिती दिली. दरम्यान, नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेला बोलवून जखमींना चक्रवाडी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करुन जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button