मालट्रक आणि कारच्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार तर 4 जण जखमी 

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन – मालट्रक आणि कारचा भीषण अपघात होऊन 2 जण जागीच ठार झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कसारा दुमाला शिवारात मालट्रक आणि कार यांचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले असून 4 जखमी झाले आहेत. आज (शुक्रवार, दि- 18 जानेवारी) सकाळी साडे सातच्या सुमारास ही घटना घडली.

नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील या भीषण अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे भूषण दिलीप वाळेकर (वय 33 रा पिंपळगाव बसवंत) व आर्यन जयवंत सांत्रास (वय 14 रा सिंगडा तलाव सारडा सर्कल नाशिक) अशी आहेत. याच अपघातात जखमी झालेल्या इतर 4 जणांना नाशिक येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे, असे समजत आहे. मुख्य म्हणजे, जयवंत शामसुंदर सांत्रास, मोहिनी जयवंत सांत्रास, उषा शरद लोहकर व देवायनी भूषण वाळेकर अशी यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. सर्वच अपघातग्रस्त हे नाशिक रहिवासी असल्याचे समजत आहे.

मालट्रक कारला समोरच्या बाजूने जोरात धडकल्याने कार समोरच्या बाजूने चकणाचूर झाल्याचे दिसत आहे. कारची अवस्था पाहूनच अंदाज येतो कारमध्ये समोरच्या सीटवर बसणाऱ्या माणसाला काय सोसावं लागू शकतं. दरम्यान वाळेकर आणि सांत्रास कुटुंबावर शोकळा पसरली आहे. नाशिक परिसरातून या घटनेबाबत हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.