डॉक्टरांनी केली ३२ किलोमीटर दूर बसून शस्त्रक्रिया 

गुजरात : वृत्तसंस्था – गुजरात मधल्या हृदय रोग तज्ज्ञांनी ३२ किलोमीटर दूर बसून रुग्णावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली. गुजरातमधील अक्षरधाम मंदिर परिसरात बसलेल्या हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टरने ३२ किलोमीटर दूरवरील अपेक्स हार्ट इन्स्टिट्यूटमधील महिला रुग्णांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया  (हार्ट सर्जरी) यशस्वीपणे करत इतिहास रचला आहे. ही शस्त्रक्रिया मानवी टेलिरोबोटिक कोरोनरीच्या माध्यमातून अवघ्या २० मिनिटांत करण्यात आली आहे. अशाप्रकारे केलेली ही शस्त्रक्रिया जगातील पहिलीच असल्याचा दावा करण्यात आला आहे.

डॉक्टर तेजस पटेल यांनी ही शस्त्रक्रिया केली आहे ज्या महिलेवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली ती  महिला रुग्ण ५० वर्षाची होती.  या महिला रुग्णाच्या धमन्यांमध्ये ९० टक्के अडथळे होते.अश्या पद्धतीची शस्त्रक्रिया करणे अत्यंत अवघड होती तरी ही काल बुधवारी ही  शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

डॉ. पटेल हे अपेक्स हार्ट इन्स्टिट्यूटचे चेअरमन तसेच कार्डिओलॉजिस्ट म्हणून २२ वर्षे काम करत आहेत. विशेष म्हणजे मंदिर परिसरात बसून मानवी टेलिरोबोटिक कोरोनरीच्या माध्यमातून डॉ. पटेल शस्त्रक्रिया हाताळत असताना तेथे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी उपस्थित होते. त्यांनी या शस्त्रक्रियेचे फोटो ट्विटवरून शेअर केले आहेत. सामान्य रुग्णाला परवडतील अशा शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. पटेल यांना सरकारकडून मदत पुरविली जाईल, असे मुख्यमंत्री रुपाणी यांनी म्हटले आहे.