क्राईम स्टोरी

‘या’ माजी उपनगराध्यक्षाच्या मुलाने लग्नाचे अमिष दाखवून केला तरुणीवर अत्याचार

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर येथे एका १९ वर्षीय विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना येथे उघडकीस आली. या प्रकरणी माजी उपनगराध्यक्षाच्या पुत्रासह चौघांवर शिरुर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. इम्रान पठाण असे आरोपीचे नाव आहे.

शिरूर येथील अत्याचार पीडित तरुणीचे लग्न मुंबई येथील तरुणाबरोबर झाले होते. मात्र इम्रान आणि सदर तरुणी फोन वरुन एकमेकाच्या संपर्कात होते. या संपर्कातूनच पुढे इम्रानने सदर विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवले. त्यामुळे सदर विवाहिता पतीला सोडून इम्रानसोबत शिरुर येथे आली होती. मात्र, येथे येऊन १० महिने झाले तरी इम्रान आपल्याशी विवाह करत नाही हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला मात्र त्याने लग्नास नकार दिला.

२७ जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१८ या काळात लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. तसेच रुकसाना इसाखा पठाण, इसाखा पठाण,आणि जाकीर अकबर पठाण यांनी तरुणीस घरी जाऊन रात्री-अपरात्री मारहाण केली, जातिवाचक शब्द वापरून आमच्या मुलाचे तुझ्या बरोबर लग्न लावून द्यायचे का? असे म्हणून शारीरिक व मानसिक त्रास दिला. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायदा तसेच अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास उपअधीक्षक मंदार नाईक करत आहेत.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या