ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूज़

एम. नागेश्वर राव सीबीआयचे प्रभारी संचालक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अतिरिक्त संचालक एम. नागेश्वर राव हे संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत. सीबीआयच्या नव्या संचालकांची नियुक्ती होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत राव यांच्याकडे या पदाची जबाबदारी राहील. केंद्र सरकारने ही घोषणा केली.

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना आज त्यांच्या पदावरून तडकाफडकी हटवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय निवड समितीने हा निर्णय घेतला. त्यानंतर राव यांच्याकडे संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

न्यायालयाने सीबीआयच्या संचालकपदी आलोक वर्मा यांची नियुक्ती कायम ठेवली होती. मात्र  सिलेक्ट समितीच्याआज झालेल्या बैठकीत सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

२ डिसेंबर २०१६ ला राकेश अस्थानांची सीबीआयच्या अंतरिम संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ५ डिसेंबर २०१६ ला अ‍ॅडव्होकेट प्रशांत भूषण यांनी राकेश अस्थाना यांच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  त्यानंतर १ फेब्रुवारी २०१७ ला आलोक वर्मा यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र २४ ऑगस्ट २०१८ ला आलोक वर्मा यांनी एका उद्योगपतीकडून २ कोटी रूपयांची लाच घेतल्याचा आरोप अस्थाना यांनी थेट केंद्रीय कॅबिनेट सचिवांना पत्र पाठवून केला होता
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या