शैक्षणिक

CBSE च्या १० वी आणि १२ वीच्या परिक्षांच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच CBSE ने आपल्या १०वी आणि १२वीच्या परिक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. CBSE च्या १०वीच्या परिक्षा २१ फेब्रुवारी २०१९ ला तर १२वीच्या परिक्षा १५ फेब्रुवारी २०१९ ला सुरू होणार आहेत. १५ फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या या परिक्षा तीन एप्रिलपर्यंत चालणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेआधी अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी सीबीएसई बोर्डाने सात आठवडे आधीच हे वेळापत्रक जाहीर केले आहे.

सीबीएसई बोर्डाने हे स्पष्ट केलं आहे की, मागच्या वर्षीप्रमाणे या वेळापत्रकामध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत. शिवाय हे वेळापत्रक असे तयार करण्यात आले आहे की, जेणेकरून कोणत्याही इतर परीक्षेत ही बोर्डाची परीक्षा येणार नाही. मागच्या वर्षी फिजिक्स आणि जेईई मेन परीक्षा एकाच दिवशी आली होती. त्यामुळे फिजिक्सची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

या परिक्षा सकाळी 10 वाजता सुरू होणार असून दुपारी दीड वाजेपर्यंत चालणार आहेत. १० वाजता परिक्षा सुरू झाल्यानंतर सुरूवातीला उत्तर पत्रिका देण्यात येईल तर १५ मिनिटांनंतर प्रश्न पत्रिका दिली जाणार आहे. cbse.nic.in या वेबसाईटवर  विद्यार्थ्यांना परिक्षेची सर्व विस्तृत माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या