दापोडी, म्हाळुंगेत जुगार अड्ड्यावर छापा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

भोसरी, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापे टाकून दोन ठिकाणी कारवाई करून तिघांना अटक केली आहे.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b4d77933-ac19-11e8-aa06-ede45a284f1b’]

भोसरी पोलीस ठाण्यात प्रवीण तुकाराम गायकवाड (२८, रा. दापोडी) याला अटक करून जामिनावर सोडले आहे. दापोडी येथील एसटी रस्त्यावर रेल्वे फाटकजवळच्या सार्वजनिक रस्तावर प्रवीण गायकवाड मटका अड्डा चालवत होता. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास भोसरी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यावेळी २५१ रुपये मिळाले तसेच मटका खेळण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले.

हिंजवडी पोलिसांनी मंगळवारी दुपारी अडीजच्या सुमारास म्हाळुंगे येथील महाराष्ट्र वजन काट्याजवळील पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकला. यावेळी मारुती हनुमंत म्हेत्रे (४५, रा. म्हाळुंगे, मुळशी, मूळ- सोलापूर) आणि बाबासाहेब शंकर कांबळे (३७, रा. म्हाळुंगे, मूळ-परभणी) या दोघांवर कारवाई केली. हिंजवडी पोलिसांनी छापा टाकून दोघांवर कारवाई केली तसेच १७०० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. तपास पोलीस करत आहेत.

कापड व्यापाऱ्याची समलैंगिक संबंधातून हत्या झाल्याचे उघड

जाहिरात