मनोरंजन

‘गली बॉय’ चित्रपटाच्या ‘त्या’ दृश्यावर सेन्सॉरची कात्री !

मुंबई : वृत्तसंस्था – रणवीर सिंग आणि आलिया भट यांचा बहूचर्चित ‘गली बॉय’ या चित्रपटातील अनेक दृशांवर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. या चित्रपटातील रणवीर व आलियाच्या १३ सेकंदाच्या एका चुंबन दृश्याला सेन्सॉरने कात्री लावली असून या दृश्याला ‘वाईडर शॉट’ मध्ये बदलण्यात आले. म्हणजे, आता चित्रपटात रणवीर-आलिया जवळून किस करताना तुम्हाला दिसणार नाहीत.

तसेच या चित्रपटाच्या ब्रांड पार्टनरच्या यादीतून एक नावही गाळण्यात आले आहे. चित्रपटातून कोणत्याही मादक पदार्थांची जाहिरात होता कामा नये, असे सेन्सॉर बोर्डाचे मत आहे. याआधी कुठल्याही चित्रपटात उत्तेजक व मादक पदार्थाचे नाव ब्लर केले जात होते. पण आता पहिल्यांदाच ब्रांड पार्र्टनरच्या यादीतून एका मादक पदार्थाच्या ब्रांडचे नाव गाळण्यात आले आहे. तसेच ‘गली बॉय’ मध्ये अनेक ठिकाणी वापरले गेलेले आक्षेपार्ह शब्द व शिव्यांना बिपसोबत दाखवले जाणार आहे.

या चित्रपटात पहिल्यांदाच रणवीर व आलिया भट यांची जोडी प्रेक्षकांना पडद्यावर दिसणार आहे. रिलीज आधीच रणवीर-आलियाच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. चित्रपटात रणवीर सिंग एका रॅपरच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी रणवीरने प्रचंड मेहनत घेतली असून डिवाइन व नैजीसारख्या रॅपर्सकडून सुमारे १० महिने त्याने प्रशिक्षण घेतले आहे. हा चित्रपट झोया अख्तरने दिग्दर्शित केला आहे. चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या