क्राईम स्टोरी

लज्जास्पद… गतिमंद असणाऱ्या अल्पवयीन मुलीवर मामानेच केले लैंगिक अत्याचार 

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – पुण्यातील चाकण परिसरात गतिमंद असणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या अत्याच्या नवऱ्याने (मामाने) लैंगिक अत्याचार केल्याची लज्जास्पद घटना समोर आली आहे. या प्रकरणी चाकण पोलिसांनी कारवाई केली असुन ४६ वर्षीय तिच्या मामला अटक केली असून या प्रकरणी नराधमाला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात अली आहे.
हि पीडित मुलगी चाकण परिसरात तिच्या वडिलांसह राहते. वडील शेतकरी असून तिच्या आईचे काही वर्षांपूर्वीच आजारामुळे निधन झाले होते. त्यामुळे हि मुलगी तिच्या वडिलांसह राहत होती. वडिलांवर तिची जबाबदारी असल्याने त्यांनी दुसरा विवाह देखील केला नाही. ते ज्या परिसरात राहत होते त्याच्या आसपास त्यांचे इतरही नातेवाईक राहत असल्याने विचारपूस कारण्यासाठी नेहमी एकमेकांचे घरी येणे-जाणे चालूच असायचे.
दोन दिवसांपूर्वी मुलीचे वडील शेती कामासाठी शेतात गेले असता पीडित मुलगी घरी एकटीच होती. यादरम्यान पीडित मुलीच्या आत्याचे पती (मामा) घरात पोहोचले. घरात पोहचताच त्यांनी दरवाजा बंद करुन घेतला आणि पीडित मुलीवर अत्याचार केले. आणि या प्रकणाबाबद कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देखील दिली. पीडित मुलीने तिच्या आत्याकडे पोटदुखत असल्याची तक्रार केली. आत्याने तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने हा सर्व धक्कादायक प्रकार तिच्या आत्याला सांगितला. आत्याने कोणताही विचार न करता विकृत मानसिकतेकता असणाऱ्या तिच्या पतीविरोधात पोलिसठाण्यात तक्रार दाखल केली.

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून याप्रकरणी अधिक तपास महिला पोलीस अधिकारी एम.टी.शिंदे.या करत आहे.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या