चाकण हिंसेप्रकारणी २० जणांना अटक

चाकण : पोलीसनामा ऑनलाईन

चाकण हिंसे प्रकरणी अटक सत्र सुरू झालं आहे. पोलिसांनी काल रात्री कारवाई सुरू केली असून ऐकून वीस जणांना अटक केलं आहे. मात्र अद्याप त्यांची नाव समोर आली नसून गुप्तता बाळगली आहे.

चौघे रात्री बारापर्यंत तर आणखी सोळा असे एकूण वीस जणांना अटक केली आहे. अशी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना पहिल्यांदा अटक. यामध्ये चाकण मध्ये कामासाठी आलेले, झोपडपट्टी आणि आस-पासच्या ग्रामीम भागातील व्यक्तींचा समावेश आहे. आज पुणे न्यायालयात हजर करण्याची शक्यता.

[amazon_link asins=’B006RHKER4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’90daa14e-9605-11e8-b77b-07e914cd7700′]

सोमवारी मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन चाकण येथे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते हे मुख्य चौकात उरतरले सकाळ पासून सुरू झालेल्या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले आणि जाळपोळ सुरू झाली यात असंख्य बस आणि खाजगी वाहनांना पेटवण्यात आले तर काहीची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी ४ ते ५ हजार जणांच्या जमावावर चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सोमवारी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन अत्यंत शांत वातावरणात चाकणच्या मुख्य चौकात सुरू होते. ज्यावेळी जमाव पांगवण्यात आला त्यावेळी अचानक एकाने बस च्या दिशेने दगड फिरकवला आणि मोर्चाला हिंसक वळण लागले, त्यानंतर पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या होत्या, याप्रकरणी चाकण पोलिसात तब्बल ४ ते ५ हजार जणांच्या जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.दंगल घडवणे, जमाव जमवणे, पोलिसांवर हल्ला अश्या प्रकारचा ठपका गुन्हा दाखल झालेल्या समाजकंटकावर ठेवण्यात आला. दरम्यान पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या जाळपोळ मध्ये ३० बस ट्रक, पोलिसांची खाजगी आणि सरकारी वाहन जाळण्यात आली आहेत. तर सर्वसामान्य जनतेच्या वाहनांना देखील लक्ष आंदोलनातील समाजकंटकानी केले आहे. यात शंभर च्या जवळपास वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मात्र आता याच समाजकंटकावर पोलीस कारवाई करताना दिसत असून २० जणांना ताब्यात घेतलं आहे.