…म्हणून शरद पवार घरातच उमेदवारी देतात; चंद्रकांत पाटलांची कोपरखळी

कऱ्हाड : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या कार्यकर्त्यांबाबत कॉन्फीडन्सच राहिलेला नाही. त्यामुळे ते थेट घरातच उमेदवारी देत आहेत, असा चिमटा महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढला आहे. सातारा, सांगली, कोल्हापुर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघातील क्लस्टरमधील शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठक कऱ्हाडमध्ये पार पडली. त्यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लोकसभेची उमेदवारी ह्या वयात त्यांना झेपणार नाही असा मी सल्ला दिला होता. मात्र त्यांना तो आवडला नाही. त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांचा कॅान्फीडन्सच राहिलेला नाही. त्यामुळे ते थेट घरातच उमेदवारी देत आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.

त्यानंतर शरद पवार हे माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आता चंद्रकांत पाटलांनीही भाजप अतुल्यबळ असणारा उमेदवार शरद पवार यांच्या विरोधात उभा करू, अशी माहिती दिली.