भारतापुढे २८९ धावांचे आव्हान

सिडनी : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मान ख्वाजा, शॉन मार्श आणि पीटर हैंड्सकोम्ब यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन डे भारतासमोर २८९ धावांचे आव्हान ठेवले आहे. मार्कस स्टोइनिसने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना ऑस्ट्रेलियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. भुवनेश्वर कुमार व कुलदीप यादव यांना प्रत्येकी दोन बळी घेतले.

थोड्यास्या संथ सुरुवातीनंतर उस्मान ख्वाजा(५९), शॉन मार्श(५४) आणि पीटर हॅड्सकोम्ब (७३) यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर सामन्यात ऑस्ट्रेलियाने पुन्हा कमबॅक केले. ५० षटकात ऑस्ट्रेलियाने ५ बाद २८८ धावा केल्या. भुवनेश्वरकुमारचे अखेरचे षटक खूप महागात पडले.

के खलील खूप महागडा ठरला. त्याच्या ८ षटकात ५५ धावा फोडून काढण्यात आली. भुवनेश्वरकुमारने दोन गडी बाद केले तरी त्याने १० षटकात ६६ धावा दिल्या. जडेजा याने १० षटकात ४८ धावा देत १ बळी मिळविला.

ऑस्ट्रेलियाने ठेवलेले आव्हान तगडे असून खेळपट्टीवर चेंडू हळू येत असल्याने जर तेथे टिकून राहिले तर भारताता २८९ धावांचा पाठलाग करणे शक्य होऊ शकेल.