‘त्या’ शिवसेना पदाधिकाऱ्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिक येथील शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुहास कांदे असे या शिवसेना जिल्हाप्रमुखाचे नाव असून राहूल सुभाष जाजू यांनी त्यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सुहास कांदे आणि आणखी दोघांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण ? 
जाजू यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. २०१० मध्ये संबंधितांनी वडाळा गटातील जमीन खरेदी करण्यासाठी जाजू यांना गळ घातल्याचा त्यांचा आरोप आहे. ५० गुंठे जागेचे बनावट कागदपत्रे बनवून हा व्यवहार करण्यात आला. मात्र जाजू यांनी अधिक विचारणा केली असता, कांदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना माहिती देण्यास टाळाटाळ केली, असा आरोप जाजू यांनी केला. मात्र संशय आल्याने जाजू यांनी जागेच्या कागदपत्रांची शहानिशा केली असता, जागा १९ गुंठे असून त्याचे कागदपत्रेही बनावट असल्याचा आरोप जाजू यांनी केला आहे.

सत्ताधाऱ्यासंह विरोधक एकजूट ; सर्वपक्षीय बैठकीत ‘हे’ 3 ठाराव पास 

माझ्यावरील आरोप खोटेच : सुहास कांदे 
पोलिसात दाखल होत असलेले गुन्हे खोटे असल्याचं सुहास कांदे यांनी म्हटलं आहे. जमीन फसवणूकप्रकरणामध्ये आपला कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष सहभाग नाही. मानकर व जाजू यांच्यात मध्यस्थी न केल्याच्या वैमनस्यातून सदरचे खोटे आरोप करीत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामागे आपली राजकीय कारकीर्द संपविण्याचा डाव असल्याचाही आरोप सुहास कांदे यांनी केला आहे. आकसापोटी आणि पोलीसही दबावाला बळी पडून गुन्हे दाखल करीत असल्याचे कांदे यांनी म्हटलं आहे.