‘पंतप्रधान आवास’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज भूमिपूजन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. त्यातील चर्‍होली, रावेत, आकुर्डी, मासुळकर कॉलनी, बोर्‍हाडेवाडी येथील गृहप्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि.9) केले जाणार आहे, अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी मंगळवारी (दि.8) पत्रकार परिषदेत दिली. या वेळी महापौर राहुल जाधव व नगरसेवक नामदेव ढाके उपस्थित होते.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दुपारी साडेचारला होणार्‍या कार्यक्रम आहे.

पंतप्रधान आवाससह अर्बन स्ट्रीट डिजाईन’ योजनेअंतर्गत आकुर्डी रेल्वेस्थानक व विशालनगर येथील रस्ते सुशोभिकरण आणि  पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीअंतर्गत फायबर केबल नेटवर्कींग कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जाणार आहे.

चिंचवडच्या प्रेमलोक पार्क येथील पोलिस आयुक्तालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्त पालिकेच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन केले जाणार आहे. हे भूमिपूजन बटन दाबून केले जाणार आहे. या जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत.