वाहतुकीचे नियम मोडून मुख्यमंत्र्यांची गाडी बुंगाट…  

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

राज्याचा कारभार जलद  चालवण्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यानीच आता जरा दमानं घ्या म्हणण्याची वेळ आली आहे. कारण मागच्या सहा महिन्यात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्याने मुख्यमंत्र्यांच्या वाहनावर १३ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दंडाची वसुली अद्याप झालीच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f6a32620-9efa-11e8-9796-ed45cb32c88c’]

मुंबईत वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे मुंबई वाहतूक  विभागाने अभिनेता सलमान खान, मनसेप्रमुख राज ठाकरे, युवासेनानेते आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह अनेक दिग्गजांना दंड ठोठावला, मात्र अद्याप  ह्या लोकांनी दंड भरला नाही. आता यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील नाव पुढे आले आहे.  दरम्यान आपल्याला या दंडाबद्दल काहीच माहिती नसून आपल्या वाहनचालकांनी वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे  स्पष्टीकरण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यासंदर्भात दिले आहे.

नियमांचे  पालन न करणे, सिग्नल तोडणे, नो एन्ट्रीमध्ये वाहन नेणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहनं उभी करणे अशा किरकोळ गुन्ह्यांसाठी राज्यभर सर्वत्र दंड आकारला जातो. पण मुंबईत हा दंड इतर शहरांप्रमाणे रस्त्यावर ट्रॅफिक पोलीस वसूल करत नाहीत. नियम न पाळणाऱ्या  मालकांना दंडाचे ई-चलन वाहतूक विभाग पाठवते.

नियम तोडणाऱ्या वाहनांच्या मालकांना दंडाचे ई-चलान वाहतूक विभाग पाठवते. त्या ई-चलाननुसार वाहनांच्या मालकांना ऑनलाइन दंड भरावा लागतो. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही ई-चलान पद्धती सुरू करून  वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्यांना चांगलाच चपराक बसवला आहे.

मुंबई मधील एका वृत्तसंस्थेने  दिलेल्या वृत्तानुसार मुंबईत ई-चलन पाठवलेल्यांपैकी बहुतांश लोकांनी वाहुकीच्या नियमांना ढाब्यावर  नेऊन बसवले आहे. त्यांनी जवळ जवळ  ११९ कोटी रुपये  रक्कम भरली नाही. थोडक्यात या एवढ्या रकमेचा दंड वसूल करणे बाकी आहे.  हा दंड  चुकवलेल्याची यादी तयार करून त्यांना नोटीस पाठवली  आहे. तयार केलेल्या यादी मध्ये  अनेक दिग्गजांची नावं आहेत. सलमान खान, आदित्य ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रवक्ते राम कदम, मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही या यादीत नावं आहेत.
[amazon_link asins=’B01951R2S2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’02399c8e-9efb-11e8-83f4-fb5bf6391752′]

दरम्यान अभिनेता अर्जुन कपूरने मात्र त्याला ई-चलनने झालेला दंड भरला आहे. तर ई-चलन भरण्यासाठी कोणीही सक्ती करत नसल्यामुळे अनेक लोक हे दंड भरत नसल्याचं मत एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्तं केलं आहे.