शाळेतील मुलांना पोलिसांच्या कामकाजाची माहिती असणे आवश्यक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शाळेमधील मुलांना पोलिसांच्या रोजच्या कामकाजाची माहिती असणे आवश्यक असल्याचे मत कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी व्यक्त केले. कोंढवा पोलीस ठाण्यात आज (बुधवार) ‘रेझींग डे’ कार्य़क्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बलत होते.

कोंढवा पोलिसांनी आयोजीत केलेल्या या कार्यक्रमामध्ये न्यु ग्रेस स्कूल व संत गाडगेमहाराज शाळेत १५० मुले उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या हस्ते न्यू ग्रेस स्कूल व संतगाडगेमहाराज शाळेतील शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

पाटील म्हणाले शाळेतील मुलांना पोलिसांच्या रोजच्या कामकाजाची माहिती असणे आवश्यक आहे त्यामुळे त्यांच्या मनामध्ये भविष्यात आपण पोलीस व्हावे अशी इच्छा होईल. त्यामुळे शाळेतील मुलांना भेटीसाठी बोलवून पोलिसांच्या रोजच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. त्यामध्ये शस्त्र, पासपोर्ट, तपास पथक, मुद्देमाल, ठाणे अंमलदार, सीसीटीएनएस, सर्वेलन्स, एलआयबी इत्यादी कामकाजाची माहीती विद्यार्थ्यांना दिली. त्या मधून वेपन व पासपोर्ट विषयीची माहिती घेण्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साह दाखवला.