आईचा खून करून मुलाची आत्महत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – मनोरुग्ण मुलाने गळा दाबून आईचा खून केला. त्यानंतर राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. भिंगार शहरात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

राहुल बापू बेंद्रे (वय 24), नंदा बापू बेंद्रे (वय 40, दोघे रा. भिंगार ) हे मयत माय-लेकाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, राहुल याच्यावर काही दिवसांपासून उपचार चालू आहे. रविवारी रात्री उशिरा राहुल बेंद्रे याचे आईसोबत वाद झाले. त्या वादातून त्याने आईचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः राहत्या घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

भिंगार येथील रहिवाशांनी  घटनेची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना दिली  त्यावरून पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटनेचे कारण अस्पष्ट
राहुल बेंद्रे यांनी आईचा खून करून स्वतः आत्महत्या का केली, याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. राहुल हा मनोरुग्ण असल्याने त्याने वेड्याच्या झटक्यातच किरकोळ वादातून हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.