क्राईम स्टोरी

जातीवाचक शिवीगाळ आणि छळ केल्याप्रकरणी ‘सीडॅक’ च्या प्राध्यपकांवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सावित्रीबाई फुले पुणे विद्याापीठाच्या आवारात असलेल्या ‘सीडॅक’ संस्थेतील एका कर्मचाऱ्याचा जातीवाचक शिवीगाळ करुन छळ करण्यात आला. तसेच त्याला नोकरीवरुन कमी केले. या प्रकरणात सहा जणां विरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी ‘सीडॅक’ मधील अधिकारी हेमंत दरबारी, कर्नल नाथ, आर. वाय. देशपांडे, रायवर्गीस, मनोज जी., श्वेता पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजीत देवीदास ठमके (वय ४०, रा. हार्मनी बिल्डींग, पिंपळे गुरव) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सीडॅक येथे कामाला होते. १७ सप्टेंबर ते २५ एप्रिल २०१८ या कालावधीत ते करारावर काम करत होते. काम करत असताना सीडॅकमधील प्राध्यापकांनी ठमके यांना जातीवाचक शिवीगाळ, आर्थिक कोंडी करुन छळ केला. असा आरोप ठमके यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे. ठमके यांच्या तक्रारीवरुन चतु:श्रृंगी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चतु:श्रृंगी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते तपास करत आहेत.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या