कॉलेजचा उपप्राचार्य सीसीटीव्हीतून ठेवायचा तिच्यावर नजर आणि… 

जयपूर : वृत्तसंस्था – लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यात अनेक मुली, महिला लैंगिक अत्याचार, छेडछाडीच्या घटनांना बळी पडत आहेत. शाळा, महाविद्यालये यांसारख्या ठिकाणीही महिला सुरक्षित राहिल्या नाहीत. राजस्थानमधील महाविद्यालयात लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. राजस्थानमध्ये जयपूर मिशनरीद्वारे चालविण्यात येणाऱ्या महाविद्यालयात उपप्राचार्यावर एका ४४ वर्षीय महिलेने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. जॉशी कुरुविल्ला असे या आरोपी उपप्राचार्याचे नाव आहे.
सदर महिलेने तक्रारीत जॉशी कुरुविल्ला या उपप्राचार्यावर त्रास देणे आणि दबाब टाकून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर महाविद्यालयाने विशाखा गाइडलाइन ही अंतर्गत समिती नेमली होती. २६ जुलै २०१८ ला समितीने चौकशी सुरु केली होती. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, विशाखा गाइडलाइन या समितीने महिलेलाच दोषी मानले. कमिटीने २२ डिसेंबरला याबाबत अहवाल दिला होता. संस्थेच्या या अहवलात महिलेलाच  दोषी मानून तिच्यावरच कारवाई करण्याची शिफारस केली आहे.
काय आहे प्रकरण –
पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी जॉशी कुरुविल्लाने २०१३ मध्ये सेंट जेवियर्स कॉलेज जॉईन केलं होत. कुरुविल्ला कॉलेजचा खजिनदार बनल्यानंतर त्याने तिला अधिक त्रास दिला. फिर्यादी महिलेचा आरोप आहे की उपप्राचाऱ्याने तिच्यावर अपमानजनक टिपणी केली तसेच कोणी नसताना स्वतःच्या रूममध्ये बोलावले. फिर्यादी महिला २०१० पासून  सेंट जेवियर्स कॉलेजमध्ये काम करत आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने सांगितले आहे की कुरुविल्लाने सीसीटीवी कॅमेरे बदलण्याचेही आदेश दिले होते. अंतर्गत समितीने दुर्लक्ष केल्यांनतर पीडितेने राजस्थान उच्च न्यायालयात धाव निर्णय घेतला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना पीडिताने आशा व्यक्त केली आहे की उच्च न्यायालयाकडून तिला न्याय मिळेल.