संपदा ऍग्री पॉलिटेक्निक कॉलेज काव्यवाचन स्पर्धा संपन्न

पोलीसनामा ऑनलाईन- पारनेर मधील टाकळी ढोकेश्वर येथील संपदा ऍग्री पॉलिटेक्निक कॉलेज येथे स्नेहसंमेलनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये वादविवाद, कथाकथन, तसेच काव्यवाचन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. २ फेब्रुवारी रोजी काव्यवाचन स्पर्धा पार पडली.

सदर काव्यवाचन स्पर्धेला कॉलेज मधील सर्व विद्यार्थ्यांना चा भरगोस प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेसाठी प्रसिद्ध कवी संडे स्पेशल फेम महाबली मिसाळ व ग्रामीण भाषेचे अभ्यासक कवी मनोज दिक्षित ह्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तीती लावून स्पर्धेचे परीक्षण केले .
स्पर्धेत सहभागी विद्यार्थी तसेच विद्याथीनिनी अनेक भुरळ घालणाऱ्या कविता सादर केल्या. उपस्तित विद्यार्थ्यांनसाठी ही स्पर्धा म्हणजे कवितांची मेजवानी ठरली.

काव्यवाचन स्पर्धे नंतर प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून आलेले कवी महाबली मिसाळ मनोगत झाले. त्यानंतर कवी महाबली मिसाळ ह्यांनी आपली कविता सादर करत उपस्तित विद्याथी, प्राचार्य तसेच इतर शिक्षकांना मंत्रमुग्ध केले  कवी महाबली मिसाळ यांनी त्यांची प्लास्टिक पिशवीवरील गाजलेली कविता ‘आठवण येते तिची’ आणि प्रेमकविता ‘भेट तू’ या कविता सादर केल्या सामाजिक प्रश्नाला हात घालणारी अन प्रेमभाव व्यत करणारी कविता विद्यार्थी च्या काळजाला भिडून गेली.

या कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य अविनाश पायमोडे, संस्थेचे अध्यक्ष संस्थापक ज्ञानदेवजी वाफारे, मयुरी नितवे,दिप्ती ठाणगे, राजेंद्र भांड, धीरज देशमुख आदी शिक्षक उपस्तित होते. अतिशय उत्साहात कार्यक्रम पार पाडला.