लोकसभा मतदारसंघांत काँग्रेसचे संभाव्य उमेदवार कोण ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघांतील उमेदवारांवर चर्चा करण्यात आली. इतकेच नाही तर उमेदवारांची चाचपणी करण्यात आली असून या बैठकीत 26 मतदारसंघांतील उमेदवारांवर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी प्रत्येक मतदारसंघातील तीन उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली.

मुंबईच्या मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. कारण राष्ट्रवादीसोबत आघाडी करुन काँग्रेस आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरी जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर 26 लोकसभा मतदारसंघांपैकी काही जागा वादग्रस्त असून तोडगा काढण्यासाठी काँग्रेस नेते पुन्हा एकदा बैठक घेणार आहेत. ज्या जागांवरील उमेदावारांच्या नावावर पुन्हा चर्चा होणार आहे त्यात औरंगाबाद, पुणे यासह इतरही काही जागा असल्याचे समजत आहे. मुख्य म्हणजे तिम निर्णयासाठी ही यादी दिल्लीला पक्षनेतृत्वाकडे पाठवण्यात येणार आहे.

संभाव्य उमेदवार –

सोलापूर – सुशीलकुमार शिंदे

वर्धा – चारुलता टोकस

दक्षिण मुंबई – मिलिंद देवरा

यवतमाळ – माणिकराव ठाकरे

नांदेड – अमिता चव्हाण

नागपूर – विलास मुत्तेमवार किंवा नाना पटोले

चंद्रपूर – देवतळे किंवा आशिष देशमुख

शिर्डी – भाऊसाहेब कांबळे

नंदुरबार – के सी पाटील