“आपले पंतप्रधान पोपटासारखं बोलतात”

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या कोण काम करतंय आणि कोण नाही हे माहीत असते. मात्र, कोण पोपटपंची करून भाषण करून जातो? आपल्या देशाचे पंतप्रधान पोपटासारखं बोलतात. पण खाली काय नाही? तुमच्या तालुक्यातही पोपटपंची आहेत, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. मंगळवेढा येथील आमदार भारत भालके यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले.

मोठ्या शहरांमध्ये आजाराचे पॅकेज असतात. त्यातून वर्षातून रोग तपासणी केली जाते. परंतु ज्यांना रोग आहे, त्यांनी तपासावे असे नाही. ज्यांना आजार नाही त्यांनीही व्याधीचे निदान करून घेणे गरजेचे आहे. या शिबिरास तालुक्यातून चांगल्या प्रकारच्या नावाजलेल्या डॉक्टरांना बोलावून शिबिर घेतले.

सर्व रोग निदान शिबिरात रोग तपासणी करणे गरजेचे आहे, असं त्यांनी म्हटलं.दरम्यान, एखाद्या राजकीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठे हारतूरे आणि भेटवस्तू येतात. तो दिवस निघून जातो. पण, आरोग्य शिबीर भरवणे आपल्या बंधू-भगिनींना सोबत घेऊन वेगळ्या प्रकारचे तत्वज्ञान देणे खऱ्या अर्थाने सेवा देणे. हे एक चांगल्या प्रकारची आमदार भालके यांना भेट आहे, असं कौतुकही त्यांनी यावेळी केले.