कोंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याने केला मोदींवर पलट वार

नवी दिल्ली : राष्ट्रीय वृत्तसंस्था – मोदींनी काळ काँग्रेस पक्षावर टीका करताना केलेल्या वक्तव्याला आज कपिल सिब्बल यांच्या कडून प्रतित्तर देण्यात आला आहे. त्यांच्या वक्तव्याने छत्तीसगड विधानसभेच्या प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. मोदींनी काँग्रेसवर टीका करण्या अगोदर त्यांचे पक्षातील आज्जी आजोबा इंग्रजांच्या सोबत होते याबद्दल हि मोदींनी बोलले पाहिजे असे सिब्बल म्हणाले आहेत.
काल नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष पद गांधी घराण्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही सच्च्या काँग्रेसी सदस्याला पाच वर्ष देऊन दाखवा.

तुमचा पक्ष गांधी  घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी चालणार पक्ष आहे. परंतु आमचा पक्ष फक्त गरिबांच्या उद्धारासाठी काम करतो असे मोदी म्हणाले होते त्याला प्रतिउत्तर म्हणून काँग्रेस नेते पी. चिदंबरम  यांनी नेहरू गांधी घराण्या शिवाय झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्षांची यादीच माध्यमांच्या समोर ठेवली असताना कपिल सिब्बल यांनी १९४२च्या चले जाव लढ्यात मोदींच्या पक्षाचे आज्जी आजोबा इंग्रजांच्या सोबत होते असे सिब्बल म्हणाले तसेच मोदींनी योग्य माहिती घेऊन टिका करावी असा चिमटा सिब्बल यांनी काढला आहे.

७० वर्षांचा हिशोब मागणाऱ्या मोदींनी अगोदर त्यांच्या आज्जी आजोबांना विचारावे कि हिराकूड, सरदार, टिहरी, भाखरा धरण कोणी बांधले? काँग्रेसने काहीच विकास केला नसता तर मग देश उभा राहिला असता का असे सिब्बल म्हणाले. सिब्बल यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देणे मोदींच्यासाठी अवघड जाईल अशी काँग्रेसच्या गोटात चर्चा असून छत्तीसगडच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या वेळी चांगलीच हालचाल झालीअसल्याचे पाहण्यात मिळाले आहे. काँग्रेसने विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान मोदींच्या बद्दल असलेला सगळा राग बाहेर काढला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे.

छत्तीसगड विधान सभेच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात टीकेची पातळी उच्च स्तरावर गेली असून निवडणुकीच्या मुष्टी युद्धात भाजपचा कस  चांगलाच  पणाला लागला आहे. राहुल गांधींनी काल  झालेल्या सभांमध्ये मोदींवर राफेल करारावरून चांगलाच  निशाणा साधला त्याच वेळी काँग्रेसच्या घराणेशाही वर मोदींनी प्रहार केला. गत निवडुकीत भाजप अल्पशा मताने  काँग्रेसच्या पुढे निघून गेले असून तो अनुशेष भरून काढण्यासाठी काँग्रेस या निवडूणुकीत काम करत असून त्यांची सत्ता छत्तीसगड मध्ये सत्ता येईल असा काँग्रेसला विश्वास वाटतो  आहे परंतु त्याची सत्ता छत्तीसगड मध्ये येणार नाही असा दावा राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.