‘त्या’ आरोपीचे पोलीस कोठडीतून पलायन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पार्टनरवर खुनी हल्‍ला केल्याप्रकरणी सध्या पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीने पलायन केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपचारासाठी रूग्णालयात नेल्यानंतर आरोपीने शौचालयातील खिडकीतुन रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पलायन केले आहे.

अनुराग भाटिया असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अधिकारी उमाजी राठोड यांनी फिर्याद दिली आहे. जुलाब आणि उलटयांचा त्रास होत असल्यामुळे खडक पोलीस अनुरागला कमलनयन रूग्णालयात घेवुन गेले होते. रूग्णालयाच्या शौचालयातील खिडकीतुन त्याने पलायन केले आहे. अनुरागने त्याच्या पार्टनरवर खुनी हल्‍ला केला होता. याप्रकरणी त्याला खडक पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली होती. कोठडीत असताना त्याला जुलाब आणि उलटयांचा त्रास होत होता. त्यामुळे रविवारी पोलिसांनी त्याला शिवाजी रोडवरील कमलनयन रूग्णालयात नेले. पोलीस अधिकारी उमाजी राठोड आणि पोलीस नाईक सातपुते यांनी अनुरागला रूग्णालयात नेले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना काही गोळया लिहून दिल्या. त्या गोळया आणण्यासाठी पोलीस नाईक सातपुते हे बाहेर गेले. त्यावेळी अनुरागने उमाजी राठोड यांना जुलाब येत असल्याचे सांगितले. त्याला शौचालयात नेण्यात आले. काही वेळात त्याने खिडकीतुन पलायन केल्याचे समजले. पोलिसांनी त्याचा परिसरात शोध घेतला. शहरात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीची गर्दी होती. त्याचा फायदा घेवुन त्याला पळ काढला आहे. खडक पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी उमाजी राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b6b1ae15-c004-11e8-a8df-4b0c208f1c3b’]

पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीला कुठला त्रास होत असेल आणि त्याला रूग्णालयात नेण्याची वेळ आली तर अशावेळी आरोपींना ससुन रूग्णालयात नेण्यात येते. मात्र, विसर्जन मिरवणुक असल्याने कदाचित खडक पोलिसांनी त्याला जवळील रूग्णालयात नेले आणि हा प्रकार घडला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.एस. पवार करीत आहेत.

गणेश विसर्जन मिरवणुकीतून  ‘बिल्डर’चे विदेशी रिव्हॉल्व्हर गायब

[amazon_link asins=’B0778JFC13,B07CKPLGDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5c5ce061-c005-11e8-b7fa-830355450be2′]