जरा हटके

‘पेट्टा’ च्या मुहूर्तावर रजनी फॅनने उडविला लग्नाचा बार 

चेन्नई : वृत्तसंस्था – सुपरस्टार रजनीकांत यांचे चाहते काही कमी नाही. जेव्हा – जेव्हा त्यांचे चित्रपट रिलीज होतात तेव्हा त्यांचे चाहते काही ना काही वेगळं करतात कधी भला मोठा पोस्टर लावतात तर कधी थिएटर बाहेर पूजा करतात तर कधी प्रतिकृतीवर चक्क  दुग्धाभिषेकही करतात  अशे त्यांचे चाहते  संपूर्ण देशात आहे. त्यामुळे त्यांचे हे प्रशंसक कधी काय करतीत यांचा काही नेम नाही

अशाच एका रजनींकात यांच्या चाहत्याने  यांचा ‘पेट्टा’ चित्रपट प्रदर्शित झाला. यावेळी चेन्नइतल्या एका थिएटर बाहेर आपल लग्न केलं आहे.  एकीकडे हा चित्रपट सुरु होता आणि चित्रपट गृहाबाहेर या जोडप्याने लग्नगाठ बांधली  चेन्नईमधल्या वुडलँड चित्रपटागृहाबाहेर त्यांनी स्टेज बांधला. इथेच विवाहसोहळ्यातील साऱ्या विधी पार पडल्या. त्यानंतर ‘पेट्टा’ पाहण्यासाठी आलेल्या प्रत्येकासाठी त्यांनी उल्पोपहाराची व्यवस्थाही केली होती.

दक्षिण भारतात पहाटे चार वाजता ‘पेट्टा’ प्रदर्शित झाला. रात्रीपासूनच अनेक चित्रपटगृहाबाहेर थलायवा रजनीच्या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चाहत्यांनी रांगा लावल्या होत्या. पहाटेपासूनच अनेक चित्रपटगृहांबाहेर फटाके फोडून, नाच करुन अगदी दिवाळीसारख्या उत्साहात रजनींच्या सिनेमाचे स्वागत करण्यात आले.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या