अल्पवयीन चुलत बहिणीवर भावाकडूनच अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – घरी राहायला आलेल्या अल्पवयीन चुलत बहिणीवर भावानेच अत्याचार करत तिला धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला अटक कली आहे. त्याला न्यायालयाने २५ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी १४ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे.

पिडीत मुलगी ही तिच्या काकाकडे राहण्यास गेली होती. त्यावेळी चुलत भावाकडून तिच्यावर अत्याचार कऱण्यात आले. त्याने ही गोष्ट कोणाला सांगू नको असे असे सांगितले. असे फिर्यादीत म्हटले आहे.

तिने हा प्रकार वडीलांना सांगितल्यानंतर समरो आला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.