‘या’ संघाने पाच वर्षांनंतर मिळवला कसोटीत पहिला विजय

ढाका : वृत्तसंस्था – हरणं आणि जिंकणं हा खेळाचा अविभाज्य भाग आहे. कारण खेळ म्हटलं की त्यात जय-पराजय हे आलंच. महत्त्वाचं म्हणजे आज जिंकणारा संघ उद्या जिंकेलच असं नाही. पण, एखाद्या संघाला विजयासाठी पाच वर्ष प्रतिक्षा करावी लागली, अशी घटना दुर्मिळच. असंच काहीसं या क्रिकेट संघाच्या बाबतीत घडलं आहे. झिम्बाब्वेने मंगळवारी बांगलादेशला कसोटी क्रिकेटमध्ये 151 धावांनी पराभूत केले. तब्बल 5 वर्षांनंतर झिम्बाब्वेने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या विजयाची कामगिरी केली. या संघाने अखेरचा विजय 2015 मध्ये मिळवला होता.  त्यानंतर मिळवलेल्या आजच्या विजयाने खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झालेला.

फिरकीपटू ब्रेंडन मवूटाने पदार्पणात चार विकेट घेतल्या, त्याला सिकंदर राझाने 33 विकेट घेत उत्तम साथ दिली. या दोघांनी विजयात सिंहाचा वाटा उचलला. झिम्बाब्वेच्या 321 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ 169 धावांत माघारी परतला. बागंलादेशकडून इम्रुल कायसने सर्वाधिक 43 धावा केल्या. झिम्बाब्वेने या विजयासह दोन कसोटीच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दुसरी कसोटी 11 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ढाका येथे होणार आहे.

रोहित शर्माने षटकारासह रचला विक्रम, कोहलीला टाकले पिछाडीवर

लखनऊ : वृत्तसंस्था  – 
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताचा कर्णधार रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात षटकार ठोकत एका विक्रमाला गवसणी घातली आहे. पहिल्या सामन्यात हिटमॅन रोहितला साजेशी कामगिरी करता आली नाही, परंतु दुसऱ्या सामन्यात त्याने ही कसर भरून काढली. दुसऱ्या सामन्यात 11 धावा करताच रोहित विक्रमाच्या शिखरावर विराजमान होणार होता. दुसऱ्या सामन्यात रोहितने षटकार लगावत एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
ट्वेंटी-20 सामन्यांत भारताकडून सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने 62 सामन्यांत 2102 धावा केल्या आहेत. या सामन्यापूर्वी रोहित कोहलीपेक्षा 11 धावांनी पिछाडीवर होता. पण या सामन्यात 10 धावांवर असताना रोहितने षटकार लगावला आणि भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.