पुणे : बुलेट चोरणारी टोळीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे, मुंबईतून नव्या कोऱ्या बुलेट चोरणाऱ्या अंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. आरोपींकडून ६ लाख २५ हजार रुपयांच्या ४ बुलेट, २ सुझुकी एक्सीस गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीला महाराष्ट्र-कर्नाटक सिमारेषेजवळ पाठलाग करुन अटक करण्यात आली.

युनूस अमीर हमजा शेख (वय-५० रा. गणपती पेठ, जैन वस्तीमागे, सांगली), बसवराज बसलिंगअप्पा वन्नूर (वय- ४९ रा. मुहारे, पोस्ट देशनूर ता. बैलव्हंगल, जि. बेळगाव, कर्नाटक), हरेश उर्फ हनी विजयकुमार रामत्री (वय-२४ रा. सक्टर नं. २९, विजय व्हिला मागे, उल्हासनगर स्टोशन रोड, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
[amazon_link asins=’B078M16N8P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’407e33c9-bdab-11e8-bb09-d1b196682297′]
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली बुलेट दोन इसम पुणे- बेंगलोर महामार्गावरुन जात असल्याची माहिती वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी जितेंद्र तुपे, गणेश साळुंके, सागर घरपडे यांना मिळाली. पथकाने दोन चोरांचा पाठलाग करुन त्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सिमारेषेजवळ अटक केली. त्यांच्याजवळ असलेली बुलेट चोरीची असल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आले. आरोपींना अटक करुन चौकशी केली असता ही बुलेट हरेश रामत्री याने चोरली असल्याचे सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मदतीने पोलिसांनी रामत्री याला अटक करुन त्याच्याकडे चौकशी केली.

चौकशी दरम्यान पुणे शहरातून नवीन बुलेट व नवीन सुझुकी एक्सीस कंपनीच्या दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून आणखी तीन बुलेट आणि दोन एक्सीस दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींनी पुणे आणि उल्हासनगर येथून दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चोरलेल्या गाड्यांपैकी चार बुलेट पुण्यातील तर दोन एक्सीस उल्हासनगर येथून चोल्या आहेत.

ही कारवाई वाहनचोरी विरोधी पथकाकडील वरिष्ट पोलीस निरीक्षक दिपक लगड, कर्मचारी जितेंद्र तुपे, गणेश साळुंके, सागर घोरपडे, मोहन येलपले यांनी केली.