पुणे मनपातील ‘त्या’ दोन नगरसेवकांसह १५ ते १७ कार्यकर्त्यांवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी कॉंग्रेसच्या नगरसेवकांसह कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलपर्णीच्या वादग्रस्त निविदेवरून महापौरांच्या दालनात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसकडून आंदोलन सुरु असताना त्यांना मारहाण करण्यात आली होती.

कॉंग्रेसचे नगरसेवक रविंद्र धंगेकर व गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह १५ ते १७ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वृद्धाश्रमात ठेवा, मी पैसे परत करतो : डीएसके 

जलपर्णीची निविदा आठपट दराने काढल्याच्या कारणावरून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक महापौरांच्या दालनात सोमवारी बैठे आंदोलन करत होते. त्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर चौकसी करण्याची मागणी केली. त्यावेळी इस्टीमेट कमिटीचे प्रमुख असलेले अतिरिक्त आयुक्त निंबाळकर तेथे आले. ते या निविदेसंदर्भात महापैरांना माहिती देत होते. निविदा प्रक्रिया ज्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली राबविली गेली. त्यांच्याकडून खुलासा नको. अधिकारी चोर आहेत असा आरोप रविंद्र धंगेकर यांनी केल्यानंतर त्याला प्रत्यूत्तर देताना असे ऐकून घ्यायला आम्ही य़ेथे आलेलो नाही. असे निंबाळकर म्हणाले. त्यावेळी नगरसेवक आणि निंबाळकर यांच्यात बाचाबाची झाली. बाचाबाचीदरम्यान एकाने निंबाळकर यांच्या श्रीमुखात लगावली. त्यानंतर निंबाळकर यांनी यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर व इतर १५ ते १७ जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.