ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूज़

नारायण पेठेतील दुकानात सिलेंडरचा स्फोट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नारायण पेठेतील पत्र्या मारूती चौकात असलेल्या फास्ट फुडच्या एका दुकानात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरु आहे.

दोन महिन्यांपुर्वी याच ठिकाणच्या एका दुकानात आग लागून तीन दुकाने जळून खाक झाली होती.

नारायण पेठेत पत्र्या मारुती चौकात खाद्यपदार्थ विक्री करणारी दुकाने आहेत. दरम्यान, बुधवारी दुपारी येथील एका दुकानात सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर तेथे आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथे धाव घेतली असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button