नगर-दौंड महामार्गावर बाप-लेकीचा मृत्यू

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – नगर-दौंड महामार्गावर मढेवडगाव परिसरात आज दुपारी दोन दुचाकींची समोरसमोरा अपघात होऊन खाली पडल्यानंतर ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत बाप-लेकीचा मृत्यू झाला. न्यू इंग्लिश स्कूलजवळ हा अपघात झाला.
यात नटराज विठोबा शिर्के (वय 56, रा. बाबुर्डी ता. श्रीगोंदे), त्यांची मुलगी कल्पना संतोष कदम (वय २८ रा. पिंपळगावपिसे ता. श्रीगोंदा) ही मयतांची नावे आहेत. दोघांचाही मृत्यू झाला. परंतु, अपघातात सात वर्षाची मुलगी सुदैवाने बचावली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, एका दुचाकीवरील नटराज शिर्के व त्यांची मुलगी कल्पना संतोष कदम हे दुचाकीवरून नगर-दौंड रस्त्याने चालले होते. मढेवडगाव शिवारात त्यांची दुचाकी दुसऱ्या दुचाकीला धडकली. त्यामुळे बाप-लेक खाली पडले. त्यावेळी त्यांच्या जवळून जाणाऱ्या ट्रॅक्टरने दोघांना जोराची धडक दिली.

यात दोघांचाही मृत्यू झाला. अपघातानंतर चालक ट्रॅक्टर जागेवर सोडून पळून गेला. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली अपघातामुळे वाहतूक काही काळ खोळंबली होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.