क्राईम स्टोरी

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरची धडक एका दुचाकीला बसली. यामध्ये दुचाकीवरील युवकाचा जागिच मृत्यू झाला. हा अपघात आज (सोमवार) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोस्ट ऑफिससमोर झाला. पांडुरंग साळुंखे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या युवकाने हेल्मेट घातले होते.

मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोस्ट ऑफिस समोर एका डंपरने साळुंखे यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे साळुंखे हा डंपरच्या चाकाखाली आला. डंपरचे चाक त्यांच्य डोक्यावरुन गेल्याने साळुखे याचा जागिच मृत्यू झाला.

अपघातानंतर नागरिकांनी गर्दी केल्याने या ठिकाणी काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या