दीपिकाचा एक्स बॉयफ्रेन्ड निहार पांड्या करणार ‘या’ सिंगर सोबत लग्न 

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूड मध्ये सध्या वेडिंग सिझन सुरु आहे. बॉलिवूडच्या मोठ्या सेलिब्रेटींपासून ते छोट्या पडद्यावरील कलाकारांपर्यंत अनेक जणांनी लग्न केले. अनुष्का -विराट, प्रियांका -निक, दीपिका -रणवीर, गिन्नी -कपिल यांच्या नंतर दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड निहार पांड्या लवकरच सिंगर नीति मोहन सोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

निहार व नीति अनेक दिवसापासून एकमेकांना डेट करत आहे. आता दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. निहार व नीति यांनी जाणीवपूर्वक लग्नाची बातमी लपवून ठेवली आहे. आपले लग्न एक खासगी सोहळा असावा, अशी दोघांची इच्छा आहे. पण येत्या फेब्रुवारीत हे दोघे लग्नबंधनात अडकणार, हे पक्के मानले जात आहे.

निहार पांड्या लवकरच ‘मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर नीति मोहन बॉलिवूडची एक आघाडीची गायिका आहे. जब तक है जान, सोनू के टीटू की स्वीटी अशा सुपरहिट चित्रपटांसाठी तिने गायले आहे.

दीपिका आणि निहार यांची भेट एका अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये झाली होती आणि तेथूनच दोघांमध्ये प्रेम बहरले. त्यावेळी दीपिका मॉडेलिंग करत होती आणि बॉलिवूडमध्येही तिचा संघर्ष सुरु होता त्यावेळी दोघे तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. तीन वर्षानंतर  दोघांचे ब्रेकअप झाले. बॉलिवूड मध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेता रणबीर कपूरसोबत दीपिका काहीवर्ष रिलेशनशिपमध्ये होती. परंतु त्याचाशी ब्रेकअप झाल्या नंतर दीपिकाने गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये अभिनेता रणवीर सिंग सोबत लग्न केले.