दीपिकाच्या महागड्या अंगठीने मोडले ‘हे’ सारे विक्रम 

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – दीपिका-रणवीरने इटलीमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं असून लवकरच ही जोडी मुंबईमध्ये परतणार आहे. त्यांनी सोशल मीडियावर फोटो टाकताच त्यांचे फोटो क्षणार्धातच व्हायरल झाले. दीप-वीरने लग्नात कोणता पोशाख परिधान केला याची उत्सुकता सर्वांनाच होती. विशेष म्हणजे लग्नात वधूच्या पोशाखाकडे सर्वांचं लक्ष असतं. पण अतरंगी फॅशनसाठी प्रसिद्ध असलेल्या रणवीरच्या पोशाखाकडे यावेळी अनेकांचं लक्ष होतं. याचमुळे लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर त्याचे गमतीशीर मीम्स व्हायरल होणं साहजिक होतं. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम सगळीकडेच या फोटोंची चर्चा होती. अशातच आता दीपिकाला साखरपुड्यात रणवीरने घातलेल्या अंगठीची जोरदार चर्चा होत असताना दिसत आहे. अंगठीची किंमत किती हा प्रश्नदेखील अनेकांना पडला आहे. अनेकजण दीपिकाच्या अंगठीची किंमत गुगलवर शोधत आहेत.

सर्वांनाच दीपिकाच्या या अंगठीबद्दल कुतूहल वाटू लागले आहे. दीपिका आणि रणवीरने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेकांच्या नजरा तिच्या हातातील अंगठीवर खिळल्या. दीपिकाच्या डाव्या हाताच्या चारही बोटांमंध्ये चार अंगठ्या दिसत आहेत. परंतु सर्वांची नजर तिच्या ‘एंगेजमेंट रिंग’कडेच गेली.

किती आहे अंगठीची किंमत?
या अंगठीची किंमत 2 ते 2.7 कोटी रुपयांची असल्याचे बोलले जात आहे. णवीरने दीपिकासाठी घेतलेली ही अंगठी सिंगल सॉलिटेअर स्केअर डायमंड रिंग या प्रकाराची आहे. अंगठीवर महागडे हिरे जडवलेले आहेत. रणवीरने दीपिकासाठी लग्नाच्या खूप आधीच ही स्पेशल अंगठी खरेदी केली होती असे समजले आहे.

अंगठीने मोडले विक्रम
मागच्या वर्षी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबंधनात अडकले. विराटने अनुष्काला 1 कोटी रुपयांची हिऱ्यांची अंगठी घातली होती. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचा बॉयफ्रेंड निक जोनासने 2 कोटी रुपयांची अंगठी दिली होती. तर अभिनेत्री सोनम कपूरला तिचा नवरा आनंद अहुजा याने 90 लाख रुपयांची अंगठी घातली होती.