आई होण्याच्या हव्यासापोटी १९ वर्षीय तरुणीने केले असे काही  

नवी दिल्ली- वृत्तसंस्था – मूल होण्याच्या हव्यासापोटी एका १९ वर्षाच्या तरुणीने चक्क लहान बाळ चोरलं आहे. तेही रस्त्याच्या कडेला राहून उपजीविका करणाऱ्या एका आईकडून गेल्या काही महिन्यांपूर्वी हि युवती एका लहान बाळाला उचलून घेऊन गेली होती. पोलिसांनि केलेल्या तपासात बाळाचा आणि त्या युवतीचा शोध लागला त्यांनी बाळाला तिच्या जन्मदात्या आईकडे सुपूर्त करून आरोपी सपना (१९ वर्ष) आणि अजित सिंह (४५ वर्ष) या दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान आरोपी सपनाने गुन्हा काबुल केला आहे.

म्हणून केली सपनाने या बाळाची चोरी

सपनाने केलेल्या गुन्ह्याची कबुली देतांना असे सांगितले की, अजित सिंह यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. आता मी त्यांच्या आयुष्यात अली असून  आम्हाला या मुलासह आयुष्यभर सोबत राहायचं होतं म्हणून मी या बाळाची चोरी केली आहे.

अशी केली होती सपनाने या बाळाची चोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २ जानेवारी रोजी पूजा नावाच्या एका महिलेने संसद मार्ग पोलिसस्टेशन येथे तिचे मूल हरविल्या संदर्भात तक्रार केली होती. तिने दिलेल्या तक्रारीत असे म्हणले होते की,डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून गायब असलेल्या बाळाचा तिने बरेच दिवस शोध घेतला.कुठेही शोध न लागल्याने ति शेवटी तिने पोलिसांत तक्रार केली.तिची तक्रार नोंदविल्यानंतर इंस्पेक्टर मनोज कुमार, एएसआय बख्शीश सिंह आणि कॉंस्टेबल हेमंत यांच्या टीमने बाळाचा शोध घेण्यास सुरूवात केली.शोध घेत असतांना त्यांना अशी माहिती माहिती मिळाली की काही दिवसांपूर्वी एक युवती एका बाळाला फुटपाथवरून उचलून घेऊन गेली होती. त्यावेळी तिला तेथील काही उपस्थितांनी देखील पहिले होते.

अजित आणि सपनाची अशी झाली होती ओळख

सूत्रांनि दिलेल्या माहितीनुसार अमृतसर येथील आरके आश्रममधून पोलिसांनी सपनाला ताब्यात घेतले होते.चौकशीत तिने अशी माहिती दिली कि बाळाला फिरोजपूर येथे अजितकडे ठेवले आहे.पोलिसांनी फिरोजपूर येथून अजितला अटकेला आणि बाळाच्या जन्मदात्या आईकडे बाळाला सुपूर्त केले.आरोपी अजितच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले असून त्याला मुलबाळ नाही. महिन्याभरापूर्वी सपनाची आणि त्याची ओळख अमृतसर येथे झाली होती.तेथेच त्यांनी एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याचे ठरवले होते. सपनाला मूळ हवे असल्याने त्यांनी हा उपद्व्याप केला आणि आता सध्या दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत.