जेलमधून फरार झालेल्या अट्टल गुन्हेगाराला अटक

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन – घरफोडी, वाहन चोरी, दरोडा या सारख्या गंभीर गुन्ह्यामधील आणि खेड पोलीस ठाण्याच्या जेलमधून फरार झालेल्या अट्टल चोरट्याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह इतर दोन साथिदारांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सावरदरी परिसरातील एअर लिक्वीड चौकात करण्यात आली. कारवाई दरम्यान दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले.

विशाल दत्तात्रय तांदळे (वय-२२ रा. बैलबाजार रोड, मंचर), गणेश भास्कर वाबळे (वय-१८ रा. भेंडमळा, मंचर), आरीफ अस्लम नाईकवाडे (वय-२१ रा. संभाजी नगर, मंचर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विशाल तांदळे हा अट्टल गुन्हेगार असून तो ऑक्टोबर २०१८ मध्ये खेड पोलीस ठाण्यातील जेलमधून फरार झाला होता. तर सर्व आरोपींवर पुणे ग्रामीण, नाशिक ग्रामीण, अमरावती शहर, अहमदनगर, बीड, पुणे रेल्वे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी ३३ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आरोपींनी १२ जानेवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास खराबवाडी शिवारीत वाघजाई नगर येथे रिंकु रजकुमार प्रजापती यांना अडवून त्यांच्याकडील बोलेरो (एमएच १४ ६९२३) आणि रोकड जबरदस्तीने चोरुन नेली होती. आरोपींनी प्रजापती यांना स्विफ्ट डिझायर (एमएच १४ डीएक्स ८७८५) अडवी घालून गाडीतील पाच जणांनी लुटले होते. याप्रकरणाची तक्रार प्रजापती यांनी चाकण पोलिसांत दिली. पोलिसांनी सावरदरी परिसरात पकडले. आरोपींनी पोलिसांना पाहताच कार सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पाठलाग करुन तीघांना पकडले तर दोन जण फरार झाले.

चोरी करण्याची पद्धत

आरोपी विशाल तांदळे मोबाईलवरुन कार बुक करीत होता. कारमध्ये बसल्यानंतर तो इतर साथिदाऱांच्या मदतीने कार चालकाला मारहाण करुन रस्त्यामध्ये सोडून देत होता. त्यानंतर कार घेऊन जाऊन गुन्हे करत होता. चोरी केलेल्या कारचा वापर करुन आरोपींनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गंभीर गुन्हे केले होते. आरोपींकडे जप्त करण्यात आलेली कार देखील चोरी असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून ही कार नाशिक ग्रामीण हद्दीतील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे उघड झाले आहे.
आरोपी विशाल तांदळे याने जलमधून फरार झाल्यानंतर नाशिक ग्रामीण मधील वावी पोलीस स्टेशन, ओझऱ पोलीस स्टेशन, अमरावती शहरात राजापेठ पोलीस स्टेशन, बिड जिल्ह्यातील गेवराई पोलीस स्टेशन येथे जबरी चोऱ्या करुन वाहन कार चालकांना लुण्याचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उप निरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस उप निरीक्षक विजय जगदाळे, पोलीस हवालदार सुरेश हिंगे, शिवानंद स्वामी, पोलीस नाईक संदीप सोनवणे, संजय जरे, हनुमंत कांबळे, अनिल गोरड, सातकर, गायकवाड, राळे, निखील वर्पे यांनी केली. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक संजय निलपत्रेवार करीत आहेत.