ताज्या बातम्या

धनंजय देसाईची जामीनावर सुटका ; भगव्या झेंड्यांसह समर्थकांची रॅली

यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे शेकडाे कार्यकर्ते त्याला घ्यायला येरवडा कारागृहाजवळ जमा झाले हाेते.

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जून 2014 मध्ये शिवाजी महाराज आणि बाळसाहेब ठाकरे यांच्याबद्दल साेशल मिडीयावर टाकण्यात आलेल्या आक्षेपार्ह फाेटाेमुळे पुण्यात दंगल उसळली हाेती. यावेळी दुपारच्या सुमारास मशिदीमधून नमाजानंतर घरी परतत असताना हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी माेहसीन शेखला मारहान केली हाेती. यात त्याचा मृत्यू झाला हाेता. या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याला मुंबई उच्च न्यायालयाने काही शर्ती घालून जामीन मंजूर केली. त्यांनतर आज त्याची येरवडा कारागृहातून जामीनावर सुटका करण्यात आली.

यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे शेकडाे कार्यकर्ते त्याला घ्यायला येरवडा कारागृहाजवळ जमा झाले हाेते. त्यानंतर शहरात भगवे झेंडे घेऊन रॅली काढण्यात आली.

दरम्यान याप्रकरणी धनंजय देसाई आणि हिंदू राष्ट्र सेनेच्या 21 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली हाेती. या 21 कार्यकर्त्यांपैकी 18 जण सध्या जामीनावर बाहेर आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय देसाई याला सशर्त जामीन मंजूर केला. त्याला आज येरवडा मध्यवर्ती कार्यालयातून जामिनावर साेडण्यात आले. यावेळी धनंजय देसाईचे शेकडाे समर्थक कारागृहासमाेर जमा झाले हाेते. देसाई ची सुटका झाल्यानंतर असंख्य चारचाकींमधून त्याच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button