सरकार जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत गंभीर नाही !

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – शिवस्मारक हा राज्यातील ११ कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. असं असतानाही सरकार त्याबाबत गंभीर नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेच्या सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सरकार शिवस्मारकाबाबत गंभीर नाही म्हणूनच त्याचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली आहे.

हा महाराष्ट्रातील जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे हा विषय न्यायालयीन वादात अडकू नये म्हणून काळजी घेण्यासाठी आधीच मुख्यमंत्र्यांना सांगितलं होत. याच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याची तक्रार खुद्द समितीच्या अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली होती. फक्त ४-४ वेळा भूमिपूजन करून दिशाभूल करण्यापेक्षा सरकारने जनतेच्या भावनेचा हा गांभीर्याने हाताळला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला आहे.

दरम्यान, यासरकारमुळे समाजातील सर्व घटक उद्ध्वस्त झाला आहे. परिवर्तन यात्रेच्या दरम्यान लोकांच्या मनात असंतोष राग निर्माण होत आहे. हा राग, असंतोष जेव्हा रस्त्यावर येतो तेव्हा त्याचे मतांमध्ये परिवर्तन होते. याच मतांचा फायदा आघाडीला होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केली.