क्रीडा

भारताला झटका, धोनीनंतर जडेजाही परतला 

सिडनी : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सिडनी वन डेमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 289 धावांचं लक्ष्य ठेवलं. मोठ्या उत्साहाने मैदानावर भारतीय संघ मैदानात उतरला. मात्र सुरुवातीलाच भारताला धक्के बसले. भारताचा सलामीवीर शिखर धवन 0, विराट कोहली 3 आणि अंबाती रायुडू 0 धावावर माघारी परतले. त्यामुळे भारताची धावसंख्या 4 बाद 3 अशी झाली होती. या धावसंख्येने भारताची अवस्था डगमगली होती.

 भारताला सावरण महत्त्वाचं होतं. त्यामुळे भारताचा हिटमॅन रोहित शर्मा आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने भारताला या धक्क्यातुन सावरलं. दोघांनीही अर्धशतक झळकावत जवळपास दीडशतकी भागीदारी रचली. रोहितने 62 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं, तर धोनीने 93 चेंडूत 50 धावा केल्या. मात्र, हे सुख भारताला जास्तवेळ अनुभवता आले नाही. ऑस्ट्रेलियाचा बेहरेनड्रॉपने धोनीला पायचित केलं. धोनीला 96 चेडूंत 51 धावसंख्या बनवत माघारी परतावे लागले. यातही सुखद म्हणजे एकच की चौध्या विकेटसाठी धोनी-रोहितने 137 धावांची भागीदारी केली.

त्यानंतर आलेल्या रविंद्र जडेजाने धावसंख्या सावरण्यात रोहित शर्माला साथ दिली आहे. सध्या रोहित 116 धावांवर आणि जडेजा 8 धावांवर खेळत आहे. रोहित- जडेजाने 24 धावांची भागीदारी करत भारताची धावसंथ्या 200च्या पार नेली आहे. मात्र जडेजालाही 8 धावांवर परतावे लागले आहे.

दरम्यान, भारतानेही सुरुवातीला ऑस्ट्रेलियाला धक्के दिले होते. भारताकडून भुवनेश्वर कुमारने कर्णधार अरॉन फिंचला अवघ्या 6 धावांवर माघारी धाडून ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर कुलदीप यादवला प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या, तर रवींद्र जाडेजाने एक बळी टिपला.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या