2.0 च्या यशानंतर राजनीकांतच्या ‘पेटा’ चा ट्रेलर आऊट 

वृत्तसंस्था : सुपरस्टार रजनीकांत यांच्या  2.0 ने देशभरात धुमाकूळ घातल्यानंतर आता राजनीकांत यांचा आगामी सिनेमा ‘पेटा ‘ धुमाकूळ घालायला तयार आहे. ‘पेटा’ चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिगदर्शन कार्तिक सुभाराज यांनी केले आहे. या चित्रपटात रजनीकांत बरोबरच नवाजुद्दीन सिद्दीकी सुद्धा दिसणार आहे. याबरोबरच विजय सेथुपत्ती, त्रिशा, बॉबी सिम्हा हे देखील दिसणार आहेत. या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत गँगस्टारच्या भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटात काय पहाल ?

पेटा तुम्हाला १९८० ते ९० च्या दशकाची आठवण करुन देईल. ‘पेटा’ म्हणजे  अॅक्शन आणि लव्हस्टोरीचा फुल्ल ऑन  कॉम्बो असणार आहे,असे ट्रेलरवरून पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर आऊट झाला होता. तेव्हापासून रजनीकांत यांचे फॅन्स या ट्रेलरची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते.  ‘पेटा’चा दिग्दर्शक कार्तिक आणि अभिनेता विजयसोबत हा त्यांचा दुसरा प्रोजेक्ट आहे. याआधी दोघांसोबत ‘पिज्जा’मध्ये एकत्र काम केले आहे.

नवाजुद्दीन या सिनेमातून तमिळ इंडस्ट्रीत पदार्पण करतो आहे. नवाज यात व्हिलनची भूमिका साकारतो आहे. या सिनेमाला घेऊन नवाज खूपच उत्सुक आहे.  सिनेमाचे शूटिंग उत्तराखंडमध्ये झाले आहे. अभिनेत्री सिमरन बग्गासोबत रजनीकांत यांची रोमाँटिक केमिस्ट्री दिसतेय.