शाओमीचा पुन्हा दिवाळी सेल धमाका;  ‘या’ स्मार्टफोन्सवर मोठी सूट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सणसूद म्हटलं की खरेदी आली. खरेदी म्हणजेच डिस्काऊंट आणि आॅफर्स आल्या. अनेक कंपन्या सण आला की, ग्राहकांसाठी वेगवेगळ्या आफर्स घेऊन येतात. आॅनलाईन खेरदीतर कर ग्राहकांची झुंबडच उडते. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्या तर एकमेकांना टक्कर देत ग्राहकांना नेहमीच आकर्षित करत असतात. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यानी आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सेलचे आयोजन केले आहे. आता मोबाइल कंपनी शाओमीने सुद्धा दिवाळी सेलच्या दुसऱ्या आवृत्तीची सुरुवात केली आहे. शाओमीच्या Diwali with Mi या दुसऱ्या सेलचे आयोजन गुरुवारपासून करण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांना शाओमीच्या विविध मोबाइल खरेदीवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट आणि ऑफर्स मिळणार आहे.
असा असेल सेल 
Diwali with Mi सेलमध्ये कमीत कमी पाच हजार रुपयांचा मोबाइल खरेदी केल्यानंतर 500 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. मोबिक्विक वाॅलेटच्या माध्यमातून पैसे भरले तर दोन हजार रुपये कॅशबॅक ग्राहकांना मिळू शकतो. तसेच, निवडक मोबाइलवर कंपनी 3500 रुपयांचे इक्सिगो कूपन सुद्धा देत आहे.
शाओमीच्या दिवाळी सेलमधील या आहेत खास ऑफर्स
– रेडमी नोट 5 प्रो या सेलमध्ये 14,999 रुपयांऐवजी 12,999 रुपयांना ग्राहक खरेदी करु शकतात.
– शाओमीचा सेल्फी स्मार्टफोन रेडमी वाय 2 वर दोन हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये हा स्मार्टफोन 9,499 रुपयांना मिळत आहे.
– पोको एफ1 हा स्मार्टफोन 20,999 रुपयांना आहे. यावर तीन हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे.
– एमआय इअरफोन्स बेसिक्स 399 रुपयांना आहेत. मात्र, या सेलमध्ये 349 रुपयांना मिळणार आहेत.
– एमआय एलईडी स्मार्ट टीव्ही 4 ए (43 इंच )  22,999 रुपयांऐवजी 21,999 रुपयांना मिळणार आहे.
– एमआय ब्रँड एचआरएक्स एडिशन ब्लॅक 1299 रुपयांऐवजी 1199 रुपये आहे.
– 20000mAh क्षमतेचा पॉवर बँक 1499 रुपयांना ग्राहकांना मिळणार आहे.
जाहिरात