सर्व नियमांना झुगारून पुण्यात डिजेचा ‘दणदणाट’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबई उच्च न्यायालयाकडून डीजेला परवानगी नाकराण्यात आली असताना देखील पुण्यातील काही मंडळांनी गणपती समोर डिजे लावल्याचे चित्र आज पहायला मिळत आहे. आज पुण्यातील सर्वजनीक गणेश मंडळांच्या गणपती विसर्जन मिरवणूका निघाल्या आहेत. या मिरवणूकांमध्ये न्यायालयाच्या आदेशाचे आदेश झुगारून मंडळांनी डिजे लावले आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5e7a7616-bf21-11e8-b5c8-e30f5318b143′]

डिजेला परवानगी द्यावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ध्वनी प्रदुषणाचे कारण देत डिजेला परवानगी नाकारली आहे. पोलीस प्रशासनाकडून देखील गणेश मंडळांना डिजे विरहीत मिरवणूक काढण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, न्यायालय आणि पोलीस यांच्या आव्हानाला दाद न देता मंडळांनी डिजे लावले आहेत. डिजेच्या तालावर गणेश मंडळाचे कार्यकर्ते थिरकताना दिसत होते. या मंडळांवर पोलीस काय कारवाई करणार हे पाहावे लागेल.

ध्वनी प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे डिजेला परवानगी नाकारावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली होती. पुण्यातील गणेश मंडळांनी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करुन डिजेला परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. काल पालकमंत्र्यांनी पत्राकर परिषद घेऊन डिजे न लवता विसर्जन मिरवणूक काढण्याचे आवाहन मंडळांना केले होते. तसेच मंडळांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करु नये असे देखील आवाहन केले होते. मात्र, गणेश मंडळांनी याकडे दुर्लक्ष करुन डिजे लावले आहेत.
[amazon_link asins=’B07FW8KSFP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’75004d83-bf21-11e8-a65b-77ebe40a5b2d’]

मुंबई उच्च न्यायालयाकडून डॉल्बीला परवानगी नाकारण्यात आल्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुका पारंपरिक वाद्यानेच काढण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यामध्ये पोलिसांनी डॉल्बीविरोधात धडक कारवाई करताना डहाणुकर कॉलनी जवळ एक मंडळाचा मिक्सर जप्त केला आहे. तर डिजे आणि स्पीकरवरच्या बंदीनंतर पुण्यातील काही गणेश मंडळे आक्रमक झाली आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीत सव्वाशेहून अधिक मंडळांनी गणेशमूर्तींचे विसर्जन करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. ही मंडळे बप्पांची मूर्ती मंडपातच ठेवणार आहेत.

काल पण पोलिसांचा मार खाल्लाय, कार्यकर्ते म्हणले चार बेस, चार टॉप लावायचे.. लावले. – डीजे