मन वळणार का ? मोदी की ठाकरे ? उद्या महारष्ट्रातील राजकारणाचा महत्वाचा दिवस 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अलीकडे लातूरमध्ये झालेल्या भाजपच्या मेळाव्यात अमित शहा यांनी, “युती झाली नाहीतर ‘विरोधीयों को पटक देंगे’ असं वक्तव्य केल्यामुळे भाजप आणि सेनेत कमालीचे संबंध ताणले गेले. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर विखारी टीका केली. नरेंद्र मोदी उद्या बुधवारी सोलापूरमध्ये येणार आहे. मोदींच्या दौऱ्याचे मुहूर्त साधून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी बीडच्या दौऱ्यावर असणार आहे.
 मोदींच्या  हस्ते 30 हजार घरांच्या प्रकल्पाचे भूमीपूजन होणार आहे. महापालिकेच्या ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ, स्मार्टसिटी अंतर्गत झालेली कामं आदी विकास कामांचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
मोदींच्या दौऱ्याचं टायमिंग साधत उद्धव ठाकरे बीडमध्ये दुष्काळी दौऱ्यावर जाणार आहे.  बुधवारी सकाळी 10 वाजता ते माळस – जवळा या गावात शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांना पशुखाद्य वाटणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांना 30 ट्रक पशू खाद्य वाटप करणार आहेत. त्यानंतर बीड येथील आशीर्वाद लॉन्स इथं उद्धव ठाकरे यांची 11 वाजता जाहीर सभा होणार आहे.
शहराच्या मध्य भागात असलेल्या इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर त्यांची जाहीर सभादेखील होणार आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातूनही मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.
युतीच्या चर्चेवरून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये घणाघाती वक्तव्य केले जात आहे . त्यामुळं उद्या हे दोन्ही नेते युतीसंदर्भात काय भूमिका मांडतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
 मोदींच्या  हस्ते 30 हजार घरांच्या प्रकल्पाचे भूमीपूजन होणार तर उद्धव ठाकरे बीडमध्ये दुष्काळी दौऱ्यावर असणार आहे. यावेळी त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे.