क्राईम स्टोरी

म्हणून बिग बॉस मधील ‘त्या’ अभिनेत्रीवर गुन्हा दाखल

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बिग बॉस फेम अभिनेत्री डॉली बिंद्रा अभिनव कमी पण वादामुळे नेहमी चर्चेत असते . व्यायाम शाळेतील कर्मचारी तसेच इतर लोकांना त्रास देणे आणि धमकावल्याप्रकरणी डॉली बिंद्राविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिक्रमण करणे, अब्रूनुकसानीकारक मजकूर वितरित करणे, धमकी देणे, शांतताभंग करणे अशा विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यायाम शाळेतील कर्मचारी तसेच इतर लोकांना त्रास देणे आणि धमकावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉली बिंद्राविरोधात यापूर्वी ही राधे माँने देखील कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र बिंद्राला नोटीस देऊन लवकरच तिची चौकशी करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या