टॉयलेट ब्रश नंतर ट्रम्प चपलांवर ; सॅम  झाला मालामाल 

न्यूयॉर्क :वृत्तसंस्था – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून ते बऱ्याचदा त्यांच्या वादग्रस्त कामावरून चर्चेत आलेले आहेत एवढेच काय त्याचे अनेक ट्विट्स देखील तितकेच वादग्रस्त ठरले आहेत. पण त्यांच्या या वादग्रस्त ट्विटचा एका चप्पल व्यावसायिकाने कुशातलेने वापर करून एकाच महिन्यात चक्क 20 लाख रुपये कमावले आहेत. सॅम मॉरिसन असे या मालामाल झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
सॅमने नक्की केलं तरी काय 
लॉसएंजल्स मध्ये राहणारा २७वर्षीय  सॅम मूळचा कलाकार आणि छायाचित्रकार आहे. त्याने डोनाल्ड ट्रम्प यांचे २०१७ साली वादग्रस्त झालेले ट्विट काढले आणि ते चक्क फ्लिप फ्लॅाप चपल्सवर प्रिंट म्हणून वापरले. सुरुवातीला त्याने या चपलांच्या १००० जोड्या तयार केल्या आणि ऑनलाईन एका वेबसाईटवर विकायला ठेवल्या.

त्याने जी चप्पल विक्रीची साईट काढली आहे त्याचे नाव देखेल तितकेच  रंजक आहे. President Flip Flops.com असे या वेबसाइटचे नाव आहे. त्याने ही साईट लॉन्च केल्यानंतर अवघ्या महिन्याभरात त्याच्या सर्व चपला विकल्या गेल्या आणि एका महिन्यात २० लाख रुपये कमावले. त्यानंतर मालामाल झालेल्या या सॅम नावाच्या व्यवसायिकाने चपलांचे प्रॉडक्शनही वाढवले आहे.

डोनाल्ड ट्रम्प टॉयलेट ब्रश 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच चर्चेत असतात. ते त्यांच्या वक्तव्यांसाठी ट्रोल होतच असतात. पण सध्या ते एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहेत. कारण आता त्यांच्या नावाचा टॉयलेट ब्रश बाजारात आला होता. विशेष म्हणजे आतापर्यंत बनविण्यात आलेले सर्व ब्रश विकले गेले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांना कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही, त्यांना तर मोठ्यांपासून ते लहानग्यांपर्यंत सर्व ओळखतात. त्यांच्या इतक्या प्रसिद्धीचं श्रेय हे त्यांचे मीम्स बनविणाऱ्यांना जातं. त्यांनी आपल्या मीम्सच्या माध्यमातून ट्रम्प यांना ही प्रसिद्धी मिळवून दिली. हे काय कमी होतं, म्हणून एका व्यक्तीने आणखी जास्त क्रिएटीव्हीटी दाखवत ‘डोनाल्ड ट्रम्प टॉयलेट ब्रश’ बनविला.

या टॉयलेट ब्रशला डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्याचा आकार देण्यात आला आहे. यात एका पांढऱ्या स्टीकवर ट्रम्प यांची प्लास्टिकची प्रतिकृती बनविण्यात आली आहे. तर केसांच्या जागेवर ब्रश दिला आहे. हे एक हँडमेड प्रोडक्ट आहे. या टॉयलेट ब्रशची किंमत २३.५० डॉलर इतकी आहे. भारतीय रुपयांत या ब्रशची किंमत १६०० रुपये इतकी आहे.